कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गेल्या १४ एप्रिल २०२१ रोजी कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अॉनलाईन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते."लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज" यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक राकाँ कार्यालयात सदर स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार सोहळा पार पडला.राजूरा विधानसभा प्रमुख अरूण निमजे हे अध्यक्षस्थानी होते तर राकाँ नेते सैय्यद आबीद अली,गडचांदूर न.प.उपाध्यक्ष तथा राकाँ तालुकाध्यक्ष शरद जोगी,गडचांदूर शहर राकाँ महिला अध्यक्षा तथा नगरसेविका सौ.अश्विनी कांबळे,जिल्हा सचिव प्रविण काकडे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील अडकीलवार आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
स्पर्धकांना प्रथम पारितोषिक शरद जोगी,द्वितीय सौ.अश्विनी कांबळे,तृतीय अरूण निमजे,चतुर्थ मिनाक्षी एकरे यांच्यातर्फे देण्यात आले.स्व.सुरेश जोगी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शरद जोगी यांच्यातर्फे सन्मानचिन्ह तथा प्रमाणपत्र देण्यात आले.गट क्रं.१ मधील "शेतकऱ्यांचा आसूड आणि आजचा शेतकरी" या विषयातील प्रथम क्रं. सिद्धार्थ चव्हाण,द्वितीय क्रं.अनिकेत दुर्गे,तृतीय क्रं.प्रलय म्हाशाखेत्री,चतुर्थ क्रं.प्रतिक्षा वासानिक.गट क्रं.२ मधील ओबीसी "जातनिहाय जनगणना काळाची गरज" या विषयातील प्रथम क्रं.आकाश कडूकर,द्वितीय क्रं.अंकुश गोहाणे, तृतीय क्रं.धनराज दुर्योधन,चतुर्थ क्रं. अविनाश रामटेके याविजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला शशिकांत चन्ने,करणसिंग बुऱ्हाणी,प्रविण मेश्राम,आकाश वराडे,सदू गिरी,वैभव गोरे,मयुर एकरे,महावीर खटोड, रोहन कुळसंगे,सतीश भोजेकर,मुनीर शेख,सुरज किन्नाके,प्रफुल मेश्राम इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
