सावली :- जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पालेबारसा या गावातील तामदेव उंदीरवाडे यांचेकडे बकरा 25 लाखांच्या किमतीत विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनर क्षेत्रात लावण्यात आलेले आहे. ग्रामीण क्षेत्रातील असलेल्या सावली तालुक्यामधील पालेबारसा गाव आहे. या गावातील तामदेव उंदीरवाडे यांचेकडे बकरा आहे . साडेतीन वर्ष वय असलेल्या बकऱ्याला जोपासना केले असून बकऱ्याचे वजन 85 किलो आहे. बकरा 25 लाख किमतीचे विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनर लावून विविध ठिकाणी चर्चेला उधाण आले आहे. लाखोरुपयांची किंमत असलेल्या बकऱ्या मधील नेमके आश्चर्य आणि वैशिष्ट काय आहे ? पालेबारसा येथील तामदेव उंदीरवाडे यांना फोन द्वारे माहिती विचारणा केली असता बकऱ्या चे कपाळावर चांद आहे आणि बकरी ईद निमित्त कपाळावर चांद असलेल्या बकऱ्याला महत्त्व प्राप्त होत असते . बकरा चे कपाळावर चंद्र असणे हेच आश्र्चर्य असून वयाचे साडेतीन वर्ष आणि 85 किलो वजनाचा बकरा विक्रीत उपलब्ध असल्याचा त्यांचा मुलगा तुषार उंदीरवाडे यांनी फोटो पाठविला आहे. नागरिकांनी आतापर्यंत गाडी, कार, घर, आलिशान फ्लॅट, बंगले, प्लॉट , शेती, महागडे लाखांचे किमतीत असलेले बघितले परंतु बकरा 25 लाखांचे किमतीचा विक्रीस असल्याने आश्चर्य वाटत आहे. 25 लाखांचा किमतीत बकरा विक्रीस उपलब्ध असल्याने नागरिकांना बॅनर पाहून आश्चर्य वाटत आहे.
