चंद्रपूर - मद्यप्रेमींचा 6 वर्षाचा वनवास मंत्र्यांच्या धडपडीने संपुष्टात आला, चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी तब्बल 6 वर्षांनी हटविण्यात आली.
या कालावधीत अनेकांनी आपली दारू दुकाने दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरित केली होती.
शासनाने त्यांच्या दारू दुकान परवाना स्थलांतराची प्रक्रिया तात्काळ सुरू करून पूर्णत्वास आणण्याचे निर्देश दिले आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दारू दुकाने या महिन्यातच सुरू होणार आहे.
दारू दुकान परवाने तात्काळ नुतनीकरणासाठी उत्पादन शुल्क कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
सोमवारपासून परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे.
सध्या जिल्ह्यातील दारू दुकान मालकांनी दुकाने साफसफाई करीत रंगरंगोटी सुरू केली आहे, आता लवकरच ही दुकाने सुरू होणार असल्याने मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित झाल्यावर दारू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला होता, महिला व अल्पवयीन मुलानी सुद्धा अवैध दारूविक्री सुरू केली, कोट्यवधी रुपयांची अवैध दारू, मुद्देमाल व हजारो आरोपी या व्यवसायात पोलिसांच्या ताब्यात होते.
दारुबंदी उठविण्याच्या निर्णयाविरोधात कुणी न्यायालयात गेले तर आपली बाजू ऐकुन घ्यावी, यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या राज्यातील मुंबई, औरंगाबाद आणि मुंबई खंडपीठात कॅवेट दाखल केले आहे.
शासनाने या दारुबंदीवर समीक्षा समिती बनवीत त्याचा अहवाल शासनाकडे सोपविला होता.
चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारु ९८, बिअर शॉपी ५० बार अँन्ड रेस्टॉरंट ३१४, आणि क्लबचे दोन परवाने नुतणीकरणासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे आहे.
वॉईन शॉपचे आधी २४ परवाने होते. आता केवळ ५ वाईन शॉपचे परवाने जिल्ह्यात आहे. नुतणीकरणासाठी २०२०-२०२१ या वर्षांचे शुल्क आकारले जाणार आहे. यातून दोन ते अडीच कोटींचा महसूल शासनाला मिळेल
वॉईन शॉपचे आधी २४ परवाने होते. आता केवळ ५ वाईन शॉपचे परवाने जिल्ह्यात आहे. नुतणीकरणासाठी २०२०-२०२१ या वर्षांचे शुल्क आकारले जाणार आहे. यातून दोन ते अडीच कोटींचा महसूल शासनाला मिळेल
