News34
#Mulnews
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - ग्राम पंचायतीच्या माध्यमातून करण्यांत येणा-या शासकिय बांधकामाच्या ई निवीदा न काढता आपण निवडलेल्या कंत्राटदारालाच काम करण्याचे आदेश दयावे, अन्यथा सरपंचासह आपल्याला महागात पडेल. असा पंचायत समिती सभापती यांनी दिलेला शासकिय कामात अडथळा आणण्याचा धमकीवजा लेखी इशा-याने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ माजली आहे.
मूल पंचायत समितीचे सभापती चंदु मारगोनवार यांनी बेंबाळ ग्राम पंचायतीचे सचिव सुखदेवे यांना ५ जून २०२१ रोजी सभापतीच्या लेटर पॅडवर पत्र पाठविले, ग्राम पंचायत कार्यालयाच्या पत्यावर टपालाने प्राप्त झालेले संगणकीकृत केलेले सदर पत्र सचिव यांचेसह सरपंच यांना आव्हान देणारे आहे. सभापती या नात्याने ग्राम पंचायत बेंबाळ करीता अनेक विकास काम आपण जिल्हा स्तरावरून खेचुन आणत असतो, त्यामूळे सर्वच कामे आपल्याला मिळाली पाहिजे असा आग्रह धरल्याचे दिसुन येते. मारगोनवार यांनी कोणत्याही कामाची ई निवीदा न काढता प्रथम त्या कामाची आपल्याला माहिती दयावी, त्याशिवाय कोणतेही काम करू नये. असे निर्देश देतांना आपल्याला न विचारता कामे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास सरपंचावर अविश्वास आणि सचिवावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केल्या जाईल. याची नोंद घ्यावी. असे कळविले आहे. यापूर्वी झालेल्या वाढीव पाईप लाईनच्या कामात मी दोषी असल्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गावक-यांना सांगता ही बाब आपल्यासह सरपंचाला महागात पडेल. असे सुचवितांना उर्वरीत कालावधी चांगला जावा असे जर वाटत असेल तर आपण सांगू त्याच प्रमाणे वागा, नाहीतर तुमचे दिवस भरले असे समजा. अशी धमकी दिली आहे. सचिव म्हणून शासनाने सोपविलेली जबाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडत असतांना सचिव यांना अचानक पंचायत समिती सभापती चंदु मारगोनवार यांनी पाठविले पत्र शासकिय कामात अडथळा आणण्याशिवाय धमकी असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान सचिव म्हणून प्रामाणीकपणे काम करणारे सुखदेवे यांनी प्राप्त झालेल्या सभापती यांच्या पत्रा विषयी जिल्हा परिषद प्रशासना शिवाय सचिव ग्राम सेवक संघटनेकडे धाव घेतल्याचे वृत्त आहे. वास्तविक जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिका-यांना ग्राम पंचायत कार्यालयात वावरण्यासाठी शासनाने आदर्श आचार संहिता लागु केली आहे. त्यान्वये सभापती मारगोनवार यांना सचिवाच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. असे असतांना सभापती पदाचा व लेटर पॅडचा गैरवापर करून मारगोनवार यांनी केलेला पत्रव्यवहार अत्यंत चुकीचा, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे गैरकायदेशीर आहे. त्यामूळे सभापती मारगोनवार यांचे विरूध्द मुंबई ग्राम पंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदी नुसार कारवाई करावी. अशी मागणी सचिव व ग्राम सेवक संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्राम विकास मंञालयाकडे केल्याचे समजले. सभापतींच्या लेटर हेडवरील पत्र मंत्रालय व सचिवालय पर्यंत गेल्याचीही चर्चा तालुक्यात केली जात आहे. सभापती मारगोनवार यांचे संगणकीकृत पत्र तालुक्याच्या राजकिय वर्तुळासोबतचं जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनात खळबळ माजली आहे. मारगोनवार यांनी महागात पडण्याचा दिलेला इशारा सचिव यांना आज महागात पडत नसला तरी बेंबाळ ग्राम पंचायतीच्या तत्कालीन सरपंचा करूणा उराडे यांना चांगलाच अडचणीत टाकणारा दिसते. मारगोनवार यांचे नेतृत्वात सरपंच पदावर आरूढ झालेल्या उराडे यांना स्वपक्षीयांनीच सरपंच पदावरून पायउतार कसे काय केले हे न उलगडणारे कोडे आहे. हे सर्वश्रृत असतांना मारगोनवार यांची सही असलेले त्यांच्याच लेटर हेडवरील पत्र त्यांच्या परवानगीशिवाय कोण बाहेर काढू शकते. हेही तेवढेच महत्वाचे आहे. मात्र सभापतींनी दिलेल्या पञाविरूध्द सचिव संघटनेने उचललेले पाऊल सुखदेवे ऐवजी मारगोनवार यांनाच आता महागात पडेल. अशी चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात केली जात आहे.
सभापती मारगोनवार
सभापतीच्या लेटरपॅडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने सचिव यांना पाठविलेले पत्र आपल्याला आश्चर्चचकीत करणारे आहे. सचिव यांना आपण असे कोणतेही पत्र पाठविले नाही त्यामूळे सदर पत्राची चौकशी करण्यात यावी व सभापतीच्या लेटर पॅडचा गैरवापर करणा-या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई व्हावी. म्हणुन पोलीसात तक्रार नोंदविणार असल्याचे सभापती मारगोनवार यांनी सांगीतले.
ए. के.सुखदेव,ग्राम विकास अधिकारी सभापती सारख्या महत्वाच्या पदावर असतांना शासकीय कामा संदर्भात पत्र देने किंवा इतर राजकीय दबावाचा वापर करुन कारवाई करण्याची धमकी देने ही बाब सभापतीला अशोभनीय असून गंभीर आहे व प्रशासकीय कामात हस्तक्षेप करणे गुन्हा आहे. करिता चंदू मारगोणवार यांचेवर कारवाई करून पद मुक्त करावे अशी मागणी ग्रामविकास अधिकारी यांनी केली आहे.
