ताजी बातमी - कोरोना विषाणूमुळे अनेक निर्बंध राज्यात लागले, यामुळे अनेकांवर उपासमारीची पाळी सुद्धा आली, व्यापार ठप्प, इतकेच नव्हे तर खाजगी वाहन चालकांना सुद्धा आपली गाडी घरीच उभी करावी लागली, ई पास साठी नवे नियम लागू झाल्याने वाहन चालकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले..
राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ७ जून म्हणजे आजपासूनच हे नियम लागू असतील. अनलॉक प्रक्रियेबाबत शासकीय स्तरावर निर्णय घेतला असला तरी स्थानिक प्राधिकरणाला निर्बंध हटवावे की ठेवावे हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर ई-पास लागेल का? यावर सरकारने स्पष्ट केले आहे की, पहिल्या ४ टप्प्यांमध्ये प्रवास करत असाल तर नियमितपणे वाहतूक सुरू आहे. केवळ ५ व्या टप्प्यातून तुम्ही प्रवास करणार असाल तर त्यासाठी ई पास आवश्यक आहे. सध्यातरी ५ व्या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश नाही. पाचव्या स्तरात जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल अशा जिल्ह्यांचा समावेश होईल.
लेवल 1 मध्ये येणाऱ्या जिल्ह्यामध्ये वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली असून ई पासची फारशी गरज पडणार नाही. मात्र पहिल्या लेव्हल मध्ये येणाऱ्या जिल्हा मधून प्रवास करताना पाचव्या लेव्हल म्हणजेच संसर्गाचा धोका अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करायचा असल्यास ई पास ची गरज लागणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या गटांमध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही हाच नियम लागू आहे. संसर्गाचा धोका अधिक असलेला जिल्ह्यांमधून प्रवास करायचा असल्यास ही पासची आवश्यकता असणार आहे. पाचव्या गटातील जिल्हे वगळता इतर गटातील जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे.
पाचव्या गटातील जिल्ह्यांमध्येही पासची सक्ती कायम राहणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी चा दर हा 20 टक्क्यांपेक्षा अधिक किंवा 75 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटामध्ये मोडतात. या जिल्ह्यांमधून बाहेर जाताना किंवा या जिल्ह्यांमध्ये येताना आवश्यक असणाऱ्या या जिल्ह्यांमधून प्रवास करण्यासाठी ई पास लागणार आहे. जिल्ह्यातील व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी काही विशेष कारणासाठीच सवलत दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय कारणासाठी किंवा अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी प्रवास करण्यासाठी ई - पास दिला जाईल.