बल्लारपूर - जिल्ह्यात अवैध दारू नंतर गांजा तस्करी वाढली आहे, चंद्रपूर जिल्हा दारूबंदी हटविल्यानंतरही अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे.
6 जूनला बल्लारपूर पोलिसांना अंमली पदार्थांची चंद्रपुरात वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे सपोनि गायकवाड, मुलानी, पोउपनी गिरीश व पोलीस कर्मचाऱ्यांनी राजुरा - बामणी मार्गावर सापळा रचला.
काही वेळात चारचाकी वाहन क्रमांक Mh34AA5607 हे संशयास्पद वाटले असताना पोलिसांनी वाहन थांबवून त्याची चौकशी केली असता वाहनात एकूण 25.144 किलोग्राम गांजा आढळला, गांज्याची एकूण किंमत 2 लाख 51 हजार 440 रुपये व जप्त करण्यात आलेले चारचाकी वाहनांची किंमत 2 लाख असा एकूण 4 लाख 51 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपी मध्ये रयतवारी कॉलरी येथे राहणाऱ्या 55 वर्षीय चंदाबाई झाडे, बंगाली कॅम्प, शिवाजीनगर येथे राहणारे 32 वर्षीय माधव मामीड व हिंगणघाट येथील 23 वर्षीय राहुल गुळघाने यांना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली.
आरोपी महिला ही चंद्रपुरात अवैध दारूचा व्यवसाय करीत होती.
सदरची कारवाई सपोनि ठाकरे, विकास गायकवाड, रमिझ मुलाणी, पोउपनी चेतन टेम्भुरने, रणविजय ठाकूर, आनंद परचाके, शरद कुडे, बाबा नैताम व दिलीप आदे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
