कोरपना, गडचांदूर येथे भाजपतर्फे "आंतरराष्ट्रीय योगदिन" साजरा
कोरपना(ता.प्र.)सै.मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्राचे माजी वित्त नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार २१ जून रोजी कोरपना, गडचांदूर येथे भाजपच्या वतीने "आंतरराष्ट्रीय योगदिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गडचांदूर येथे शहर भाजपच्या वतीने येथील बालाजी सेलिब्रेशन येथे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी योग शिक्षक हलदार,किन्नाके सर,श्रीमती चंद्रभागा वरारकर यांना शाल,श्रीफळ,शिल्ड व मास्क भेट देऊन सत्कार करण्यात आला.भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांनी आपल्या प्रास्ताविकात योगाचे म्हत्व व योगदिन केव्हापासून साजरा केला जात आहे,यासंबंधी सविस्तर माहिती दिली.सतीश उपलेंचीवारांसह भाजप युवा नेते व माजी नगरसेवक निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,हरी घोरे,अरविंद कोरे,उद्धव पुरी,विनोद कावतवर,सूनील जोगी, संजय भुजाळे,प्रतीक सदनपवार, अजी़म बेग, तुषार देवकर,सुयोग कोंगरे, कुणाल पारखी, इमरान पाशा,रितीका बारसागडे,वैभव राव,माजी नगराध्यक्षा सौ.विज्यालक्ष्मी डोहे,रंजनाताई मडावी, रितीका ताजने,सौ.सपना सेलूकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.निलेश ताजने यांनी आभार व्यक्त केले.
कोरपना भाजपच्या वतीने स्थानिक श्रीकृष्ण सभागृह येथे जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भाजप तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.योग गुरू बंडू मोहितकर सर, किशोर बावने,डॉ.भास्कर मुसळे,दिवाकर मालेकर, संजय मुसळे, रमेश पा.मालेकर, नगरसेवक अमोल आसेकर, ओम पवार,पवन मोहितकर,बालू पाणघाटे आदी मान्यवरांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.या दिनाचे औचित्य साधून नारायण हिवरकर यांच्या हस्ते योग गुरु बंडू मोहित्कर यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योग गुरू दिवाकर मालेकार यांचा सत्कार करण्यात आला. योग गुरु मोहितकर सर यांनी योगाबद्दल सखोल मार्गदर्शन व योग प्रशिक्षण दिले. भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व योगाची आवड असलेल्या नागरिकांनी याचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे संचालन किशोर बावणे तर आभार ओम पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय योग दिनानिमित्य अनुभवी योग प्रशिक्षकांचा सत्कार
मुल- दिनांक 21/6/2021 रोजी राष्ट्रीय योग दिना निमित्त मुल येथील तालुका क्रीडा संकुलन येथे सकाळी 6.30 वाजता योगाचे व प्राणायाम करण्याचे आयोजन करण्यात आले होते. प्राणायाम झाल्यानंतर योग प्रशिक्षकाचे उत्तम कार्य करीत असलेले योग प्रशिक्षक अनिल गांगरेडीवार सर, दिलीप मोकळे सर यांचा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मान. संध्याताई गुरनुले, नगर परिषदेच्या अध्यक्षा प्रा.रत्नमाला प्रभाकर भोयर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदु रणदिवे ,भाजपा मुल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेक योग साधक उपस्थित होते. निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे फार महत्व असल्याचे मनोगत जि. प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, व नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांनी व्यक्त केले. योग दिनाच्या निमित्याने अल्पोपहार करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक योग दिवस साजरा
घुग्घुस चंद्रपूर मार्गांवरील मल्हारगड दत्त मंदिर देवस्थान परिसरात घुग्घुस येथे सोमवार 21 जून रोजी सकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम 2015 मध्ये 21 जून हा वर्षभरातील सर्वात मोठा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन जगाला केले होते. आज जगातील सर्व देशात हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले आज आपण 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहो. भाजपाच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक गावांमध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात झाले. सध्या कोरोना संकटात योगाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. योग ही आपल्या देशाची ओळख होती, ती आज जगाच्या काना कोपऱ्यात पोहचली आहे. करे योग रहे निरोग.
लोकलेखा समितीचे अध्यक्ष मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व योग शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, वाफारा मशीन देऊन करण्यात आला.
यावेळी युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, माजी जिप सभापती सौ. नितुताई चौधरी योग शिक्षक अनिल नित, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी जि.प. सदस्य चिन्नजी नलभोगा, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, सुचिता लुटे,वैशाली ढवस, प्रेमलाल पारधी,डॉ. ठाकरे, सुमन वऱ्हाटे, वंदना बोबडे, बबन कोयाडवार, हेमराज बोंबले, प्रवीण सोदारी, सिनू कोत्तूर, निरंजन नगराळे, पांडुरंग थेरे,दशरथ असपवार, भारत साळवे, तुलसीदास ढवस, रवी चुने, हेमंत पाझरे,सुशील डांगे उपस्थित होते.
घुग्गुस योग गुरू अश्विनी पेरकर यांनी सांगितले योगाचे महत्व
घुग्गुस - 21 जून ला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात विविध ठिकाणी योग शिबिर घेण्यात आली.
घुग्गुस शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात योग गुरू अश्विनी पेरकर यांच्या उपस्थितीत योगासनाचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमात वेकोलीचे ओमप्रकाश फुलहारे, विनोद पाटील, दिलीप कुमार, बललेवार, बाराहाथे, वाघ, संजय तिवारी व इंदिरा नगर, राजीव कॉलोनी, सुभाष नगर मधील नागरिकांची उपस्थिती होती.