घुग्गुस - पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी शेतात पेरणीच्या कामात व्यस्त आहे, विजेच्या गडगडाटासह 30 जूनला हवामानात बदल झाला.
सोनेगाव येथे गोवर्धन किसन गोहणे हे शेतात काम करीत असताना त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडली, यामध्ये गोहणे यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
