News34
ऊर्जानगर(चंद्रपूर):-आज संपूर्ण जगावर कोरोना बिमारीचे संकट आले असून अनेकांचे आक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागले हे लक्षात घेऊन तसेच वटसावित्री हा महिलांचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो पण चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र येथील श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ ऊर्जानगरच्या महिलांनी या परंपरेला वेढा देत "झाडे लावा, झाडे जगवा" या संदेशाप्रमाणे महिलांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधून वड या झाडांचे पूजन न करता रोपण केले व ते वाढवण्याचे व जगविण्याची जबाबदारी मंडळाच्या महिलांनी घेतली.आणि दरवर्षी हा उपक्रम नित्याने राबविणार असा संकल्प केला.
या कार्यक्रमाला श्री गुरुदेव सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमा उगे, सचिव सविता हेडाऊ तसेच मंडळाच्या सदस्या योगिता कोंडेकर ,अर्चना गोहणे,मुक्ता पोईनकर,कमल पिदूरकर,सुनंदा कन्नमवार,मंगला कामडे, संगीता जोगी यांचे सहकार्य लाभले.
