कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषद अंतर्गत शहरातील ओपनस्पेस सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतीचे बांधकाम जलदगतीने सुरू असून काही सुज्ञ नागरिकांच्या विनंतीवरून दोन दिवसापुर्वीच विरोधी नगरसेवक रामसेवक मोरे व नगरसेवक अरविंद डोहे यांनी भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांच्यासह शहरात सूरू असलेल्या समस्त ओपनस्पेस सौंदर्यकरण व काही नाली बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती.यातील एकही कामावर न.प. किंवा पीएमसीचा इंजिनिअर उपस्थितीत नव्हता.निव्वळ रामभरोसे सदर काम सुरू असून संबंधित ठेकेदार कामात धांदली करत निकृष्ठ दर्जाचे काम करीत असल्याचे आरोप या नगरसेवकांनी केले आहे.
विशेष म्हणजे टेस्टिंग दरम्यानच बदाबदा गळत असलेल्या शहरातील नवीन पाणी टाकीचे बांधकाम ज्याच्या देखरेखीत झाले.त्याच मेकॅनिकल इंजिनिअर(स्वप्नील पिदूरकर)कडे या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे.न.प.कडे सिव्हिल इंजिनिअर उपलब्ध असताना सिव्हिलची कामे मेकॅनिकल इंजिनिअर कडेच का दिली जाते हा संशोधनाचा विषय बनला आहे.निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याची तक्रार वारंवार वरिष्ठांकडे करूनही कारवाई तर सोडाच साधी चौकशी सुद्धा होत नसल्याने वरिष्ठांची भुमिका संशयास्पद बनली आहे.
"मुख्याधिकारी म्हणतात आम्ही याची पीएमसी दिली परंतू माझ्या मते सभागृहात कधीही पीएमसीचा ठराव झालेला नाही.मग पीएमसी देण्याचा प्रश्नच येत नाही.आपल्याकडे सिव्हिल इंजिनीअर उपलब्ध आहे.आणि त्याच्याकडे फारसे काम ही नाही.परंतु हे पिदूरकर व सीओ मॅडम यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार चालू आहे.पीएमसी दिली असेल तर प्रत द्यावी,अशी मागणी मी केली असता प्रत माहिती अधिकारातून घ्यावी ती ३० दिवसानंतर तुम्हाला मिळेल हे सांगणे चुकेचे आहे.मी एक नगरसेवक आहे आणि अशा पद्धतीने जर मला माहिती मिळत असेल तर या कालावधीत सदर कामात भ्रष्टाचार होऊ शकते.माझी मागणी ऐवढीच आहे की,पीएमसीची प्रत मला तात्काळ द्यावी,त्या कामावर न.प.इंजिनिअर असो की पीएमसीचा असो तो हजर असल्या शिवाय काम करू नये अन्यथा आम्ही हे काम होवु देणार नाही" अशी माहिती नगरसेवक डोहे यांनी News34 ला आनकॅमेरा दिली असून यासंबंधीचे निवेदन न.प.ला दिल्याची माहिती आहे.दरम्यान या विरोधी नगरसेवकांनी सदर कामे बंद पाडली असून आता मुख्याधिकारी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.काही का असेना सदर प्रकरणी विरोधी नगरसेवक सध्या आरपारच्या मूड मध्ये असल्याची शंका व्यक्त होत आहे.
