मूल- ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी देशाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मुख्य मागणीसह पदोन्नतीत ओबीसींना आरक्षण मिळावे, नोकर भरतीत ओबीसींना स्थान मिळावे, ओबीसी समाजाच्या हक्क व न्यायासाठी आयोग स्थापन करावे आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी ओबीसी समन्वय समिती शाखा मूल आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गांधी चौक येथे निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालार्पण केल्यानंतर ओबीसी बंधु आणि भगिनींनी ओबीसींना न्याय व हक्क मिळालाच पाहिजे अश्या घोषणा देत तहसिल कार्यालय गाठले. समितीच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर यांची भेट घेवुन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी ओबीसी समनव्य समिती शाखा मूलचे समन्वयक जितेंद्र बल्की, जितेंद्र लेनगुरे, लक्ष्मण खोब्रागडे, मंगेश पोटवार, सुनिल शेरकी, युवराज चावरे, गंगाधर कुनघाडकर, कैलाश चलाख यांचेसह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, न. प. उपाध्यक्ष नंदू रणदिवे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, नगरसेवक प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, प्रशांत लाडवे, विनोद कामडे, सरपंच अखिल गांगरेड्डीवार, रविंद्र कामडे, बाजार समितीचे संचालक शांताराम कामडे, माळी महासंघाचे विदर्भ सचिव गुरूदास गुरनुले, साई मिञ परीवाराचे विवेक मुत्यलवार, राकेश ठाकरे, मारोती वराटकर, दिलीप वारजूकर, योगेश पेंटेवार, पञकार संजय पडोळे, चंदू चटारे, प्रशांत बोबाटे, निखिल वाढई, महेश जेंगठे, आकाश येसनकर, प्रशांत गट्टूवार, जगदीश कडस्कर, रोहित निकुरे, प्रभाकर धोटे, सुरेश फुलझेले, गुरुदास चौधरी, राकेश मोहूर्ले, गौरव शामकुळे आदींसह तालुक्यातील असंख्य ओबीसी पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
