News34
चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती , वाणिज्यिक , औदयोगिक , सरकारी कार्यालये , सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची मार्च २०२० ते मार्च २०२१ या मागील वर्षाची २७५ कोटी ३६ लाख व मार्च २०२१- २०२२ या चालू वर्षाची मे २०२१ पर्यंत ७१ कोटी २ ९ लाख अशी एकंदरीत थकबाकी ३४६ कोटी ६५ लाखाच्या घरात पोहोचल्याने थकबाकीदारांविरोधात वीजपुरवठा खंडीत करण्याची धडक मोहिम राबविण्यात येत असून थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील चालू वर्षातील घरगुती ग्राहकांकडुन ४१ कोटी ३८ लाख ३२ तर मागील वर्षातील ३२ कोटी ८४ लाख येणे आहे , वाणिज्यिक गाहकांकडुन चालू वर्षातील ८ कोटी ९ २ लाख तसेच मागील वर्षातील ६ कोटी ७७ लाख येणे आहे. औदयोगिक ग्राहकांकडुन चालू वर्षातील ३ लाख व मागील वर्षातील ३ कोटी ७० लाख , सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहक चालू वर्षातील ७४ लाख व मागील वर्षातील ४ कोटी ३६ लाख , पाणीपुरवठा योजनांकडे चालू वर्षातील १ कोटी ४८ लाख व मागील वर्षाची २ कोटी ९ ७ लाख , , शहरी व ग्रामिण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी दोन्ही जिल्हयातील नगरपालिकांकडे व ग्रामपंचायती मिळूण चालू वर्षातील १३ कोटी ७ लाख व मागील वर्षातील तब्बल २२२ कोटी ३ ९ लाख थकबाकी जमा झाली आहे. यासंदर्भात भ्रमणध्वणी संदेशवजा तसेच छापिल नोटीशी देण्यात आल्या आहेत. नोटीशी देवून आता नोटीशींची मुदतही संपली आहे . त्यामुळे घरगुती ग्राहकांसोबत आता पाणीपुरवठा योजना , पथदिवे , थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये , नगरपालिका , स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण खंडीत करण्याची कारवाई करणार आहे . वीजपुरवठा खंडीत झाल्यास सामान्य जनेतेची असुविधा थकबाकी न भरल्या गेल्यामुळे ओढावणार आहे . सरकारी कायालये तसेच पाणीपुरवठा योजणा , ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्या थकबाकी संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वरीष्ठ अधिकारी यांच्या भेटी घेवून वीज बिल भरण्याची विनंती केली आहे. तसेच उपमुख कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) , जिल्हा परिषद चंद्रपूर , यांनी गट विकास अधिकारी यांना संबंधित वीजबिलाच्या थकबाकीचा भरणा ग्रामपंचायत स्तरावर करण्यासंबंधी पत्र दिनांक १६ जून २०२१ ) कळविले आहे . महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे . हाती आल्या आल्या वीजबिल आपली जबाबदारी म्हणून वीजबिल भरणारे ग्राहक एकीकडे तर थकबाकीदार एकीकडे अशा दुहेरीत महावितरण सापडली आहे . वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वसुलीतून प्राप्त पैश्यातून ८५ टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते . याउलट अनेक सेवांसाठी किंवा वस्तु खरेदीसाठी प्रथम पैसे मोजावे लागतात व नंतर सेवा मिळते. करोनाच्या महामारीच्या काळात देखिल महावितरणचे कर्मचारी अंखडीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी झटत आहेत . अनेकांना करोनाची लागन होवून जीवही गमवावा लागला . उन , वारा , पाऊस पाण्यातही महावितरणचे अभियंते व वीजकर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास प्रयत्नशिल असतात .महावितरण ज्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते त्यांनाही पैसे दयावे लागतात तर ज्या कंपन्यांकडून वीजनिर्मिती कंपन्या विजनिर्मितीसाठी कोळसा व तेल इत्यादी खरेदी करतात त्या कंपन्यांनाही वीजनिर्मीती कंपन्यांना पैसे मोजावे लागतात . थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने , वीजपुरवठा करण्यास कर्ज घेवून वेळोवेळी वीजपुरवठा करावा लागत आहे.