घुग्गुस - कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात ओसरत असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल प्रशासन सावधानता बाळगत आहे.
संचारबंदीमध्ये काही लोक नियम पाळत नसल्याने प्रशासन त्यांचेवर कारवाई करीत आहे.
घुग्गुस शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन व RTPCR चाचणी करण्यात येत आहे.
आरोग्य विभाग व घुग्गुस पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली असता यामध्ये एकूण 105 नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात आली.
या 105 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याच नागरिकांची RTPCR चाचणी करण्यात आली त्याचा अहवाल 2 दिवसानी प्राप्त होणार आहे.
सदर मोहिमेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. श्रद्धा माडूरवार, लॅब टेक्निशियन सायली साखरकर, परिचारिका श्रद्धा धोटे, प्रणाली बडोले व चालक सचिन गिर्हे आणि घुघुस पोलिसांनी राबविली.