मुल- मुल येथील गांधी चौकात सायंकाळी 5-30 वाजता अमित बालुदास येरणे वय (१९) हा आपल्या दुचाकीने जात असतांना चंद्रपूर कडून येणाऱ्या आयसर कंपनीच्या चारचाकी गाडी क्रमांक टी. एस.-२०-६७३२ ही गाडी भरधाव वेगाने चंद्रपूर कडून चामोर्शी कडे जात असतांना दुचाकी वाहन चालक क्रमांक एम.एच.-३३ बी- ३६४८ या युवकास मागून धडक दिल्याने या अपघातात अमित बालुदास येरणे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.
