#ChandrapurMsedcl
चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक,सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची मार्च 2020 ते मे 2021 पर्यंत 71 कोटी 29 लाख अशी एकंदरीत थकबाकी 346 कोटी 65 लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वीजपुरवठा खंडीत करण्याची धडक मोहिम सुरू करण्यात आली व आतापर्यंत 17 हजार 122 ग्राहकंाचा वीजपुरवठा ख्ंाडीत करण्यात आला आहे. 358 ग्राहकंाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडीत करण्यात आला आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील अजूनपण, घरगुती ग्राहकांकडुन 69 कोटी 22 लाख येणे आहे, वाणिज्यिक गाहकांकडुन 12कोटी 26 लाख येणे आहे. औदयोगिक ग्राहकंाकडुन 9 कोटी 75, सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहक 8 कोटी, पाणीपुरवठा येाजनांकडे 4 कोटी 17 लाख व, षहरी व ग्रामिण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी दोन्ही जिल्हयातील नगरपालिकांकडे व ग्रामपंचायती मिळूण 235कोटी येणे आहे. 62 हजार 365 ग्राहकंानी 18 कोटी वीजबिलाचे पैसे भरल्यामुळे आता ही थकबाकी 329 कोटी 45 लाखंावर आली आहे. परंतु या महिण्यात व येत्या दिवसात ही मोहिम अधिक तीव्र गतीने राबविण्यात येणार आहे. आलापल्ली विभागात 40 ग्रामपंचायत पथदिव्यांचा वीजपरुवठा 7 कोटी 32 लाखंाच्या थकबाकीसाठी मार्च 21 पासून ख्ंाडीत करण्यात आला आहे.
बल्लारषा विभागात 3 हजार 45 ग्राहकंाचा, चंद्रपूर विभागात 2 हजार 773 ,वरोरा विभागात 2 हजार 149, आलापल्ली विभागात 4 हजार 769,ब्रम्हपुरी विभागात 1 हजार976 व गडचिरोली विभागात 2 हजार 410 थकबाकीदार ग्राहकंाचा वीजपुरपठा महावितरणने खंडीत केला आहे.
थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देषपांडे यंानी केले आहे.
वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकंाना पर्यावरणपुरक आॅनलाईन पेमेंट, माबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ग्राहकंाचा प्रतिसादही या सुविधांना चंागल्याप्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे. परंतु अनेक थकबाकीदारांची थकबाकी साचवून ठेवण्याची सवय महावितरणची डोकेदुखी वाढविणारी आहे. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी याआधी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच ऑनलाईन बिल भरण्यासाठी 0.25 टक्के सूट दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिल वेळेवर भरण्याचे कर्तव्य समजून वेळेवर वीजबिल भरणारे ग्राहक ,एकीकडे तर दुसरीकडे थकबाकीदार. विकल्या गेलेल्या वीजेच्या प्रत्येक युनिटची बिजबिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेवून ग्राहकंाना वीजपुरवठा करण्याची जवाबदारी पार पाडतांना थकबाकीदारंामुळे महावितरणला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
