घुग्गुस - शहरातील वेकोली वसाहत गांधीनगर येथील क्वार्टर क्रमांक 141 येथे राहणाऱ्या 32 वर्षीय वेकोली कामगार देवदास उटला याचा मृतदेह घरी आढळून आल्याने परिसरात अनेक तर्क वितर्कांना उधाण आले.
सदर मृतक कामगार हा निलजई कोळसा खाणीत नोकरीवर होता, काही दिवसांपूर्वी देवदास ची आई व बहीण कामानिमित्त तेलंगणा राज्यातील स्वगावी गेले होते त्यामुळे देवदास हा एकटाच घरी राहत होता.
मागील 2 ते 3 दिवसांपासून देवदास घराच्या बाहेर निघाला नसल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली असता त्याचा मृतदेह घरी आढळून आला.
शेजाऱ्यांनी याची सूचना घुग्गुस पोलिसांना दिली, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा केला.
देवदास च्या मृत्यूचे नेमके कारण काय याचं गूढ शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार.
पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.
