चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथील बफर क्षेत्रात आगरझरी येथे 8 मे ला अंदाजे 9 ते 10 वर्षाचा नर वाघ जखमी अवस्थेत आढळला.
त्या नर वाघाच्या शरीरावर अनेक जखमा आढळुन आल्या असून तो जागेवरून हालचाल करू शकत नव्हता.
वनविभागाने वाघाला तपशीलवार तपासणीसाठी गोरेवाडा बचाव केंद्रात पाठविण्यात आले, वाघाच्या शरीरावर त्या जखमा वाघांच्या झुंजीत किंवा वाहनांच्या धडकेत लागल्या असाव्या असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
