चंद्रपूर - चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मातोश्री 95 वर्षीय केराबाई खाडे यांचं आज दुःखद निधन झाले.
मागील 10 दिवसांपासून त्यांचेवर वणी येथील डॉ. लोढा यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान अचानक ब्रेनची नस चोकअप झाल्याने त्यांचं निधन झालं.
त्यांच्या निधनाने खाडे परिवारात शोकमग्न वातावरण आहे.
त्यांच्यामागे बाळासाहेब खाडे मुलगा व 5 मुली असा आप्त परिवार आहे.
