चंद्रपूर - रक्तातील पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट्स बाजूला काढल्यावर रक्तातील द्रवस्वरूप जो भाग उरतो त्याला प्लाझ्मा म्हणतात. आपल्या शरीरातील द्रव पदार्थांमध्ये ५५ टक्के भाग प्लाझ्माने व्यापलेला असतो.
कोरोनाच्या आजारातून पूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा, करोनाने बाधित असलेल्या आणि मध्यम गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाच्या शरीरात शिरेवाटे उपचारासाठी दिला जातो, त्याला 'कॉन्व्हालिसन्ट प्लाझ्मा थेरपी' म्हणतात.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मागील 30 वर्षांपासून कार्यरत रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी आपल्या 59 व्या वाढदिवशी प्लाझ्मा दान केला.
काही दिवसांपूर्वी डॉ. हजारे यांना कोरोनाची बाधा झाली होती, कोरोनाच्या विळख्यातून पूर्णपणे स्वस्थ झाले.
आपल्या प्रत्येक वाढदिवशी ते रक्तदान करीत असतात मात्र देश व राज्यात कोरोना महामारीच्या धुमाकुळात रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी फायदेशीर ठरत आहे.
यासाठी डॉ. हजारे यांनी यंदा प्लाझ्मा दान करीत आपल्या सेवाभावी मनाचे कौतुकास्पद उदाहरण पुढे केले.
त्यांनी कोरोना संसर्गातून बरे झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा दान करण्याची विनंती केली.
कोरोनाची बाधा झाल्यामुळे गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला पहिल्या ७२ तासात प्लाझ्मा थेरपी दिली जाते. बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अॅण्टिबॉडीज या प्लाझ्मामध्ये असतात. त्यामुळे प्लाझ्मा घेणाऱ्या रुग्णाच्या आजाराचे गांभीर्य कमी होते, त्याच्या शरीरातील कोरोनाच्या तो लवकर बरा होण्याची शक्यता असते.
यावेळी डॉ. सरिता हजारे, डॉ. शैलेंद्र जांभुळकर, डॉ. देवेंद्र माहुरे, दिलीपकुमार कुंभारे आदींची उपस्थिती होती.
