घुग्गुस - कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन लागले त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना बसला मात्र या लॉकडाउन चा जास्त फायदा अवैध धंदे व्यावसायिकांना चांगला झाला आहे.
एकीकडे रोजगार गेल्याने नागरिक घरी बसले तर दुसरीकडे कोरोनाच्या नावावर अवैध दारू, सुगंधित तंबाखू व रेती तस्करीत मस्त असलेले माफिया.
मागील अनेक वर्षांपासून राज्यात रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने बांधकाम क्षेत्राला वाईट दिवस आले होते मात्र वाळू माफियांनी ती कमतरता पूर्ण केली.
वाळू घाटाचे लिलाव झाले ते सुद्धा अर्धवट ज्या तालुक्यात वाळू घाट लिलाव झाला नाही त्याजागी अवैध वाळू माफिया रोज रेती उपसा करीत आहे.
घुग्गुस येथील वर्धा नदीच्या तीरावर असलेले चिंचोळी घाटात वाळू तस्कर रोज हजारो ब्रास रेती उपसा करीत महसूल विभागाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवीत आहे.
यांच्यावर कारवाई मात्र नाममात्र होत असते, विशेष म्हणजे अवैध धंदे व रेतीची वाहतूक थांबविण्यासाठी घुग्गुस पोलीस स्टेशनसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले मात्र वाळू तस्कर मुजोरीने मुद्दामून पोलीस स्टेशन समोरून वाळूची वाहतूक करीत आहे.
घुग्गुस पोलीस पूर्णतः मुकदर्शक बनली असून जणू अवैध धंदे करणाऱ्याना त्यांचा आशीर्वाद तर नाही अशी चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.