पोम्भूर्णा - चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू तस्करांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली की पोम्भूर्णा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत आहे.
माहितीच्या आधारे खाडे यांनी पथक तयार करीत कारवाई संदर्भात सूचना दिल्या, सदर पथक पोम्भूर्णा येथे दाखल झाले व पोम्भूर्णा येथील शेख जब्बार नावाच्या इसमाने कसरगट्टा या मार्गावरील शेतावर अवैध देशी दारूचा साठा लपवून ठेवला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
पथकाने सापळा रचत सदर शेतात छापा मारला असता त्या ठिकाणी 30 पेट्या देशी दारू, 3 पेट्या विदेशी दारू व दुचाकी वाहन जप्त करण्यात आले, आरोपी जब्बार शेख हा पोलिसांना बघताच त्या ठिकाणाहून पसार झाला.
देशी, विदेशी व दुचाकी वाहन याची एकूण किंमत 3 लाख 93 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीवीरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोउपनी सचिन गदादे, अमजद खान, अविनाश दशमवार, गजानन नागरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.