वरोरा - कोरोना काळात जिल्ह्यात अवैध धंद्याना उत आले असून त्यात दारूच्या व्यवसायाने जिल्ह्यात भरारी घेतली आहे.
मात्र या व्यवसायात एका मित्राने दुसऱ्याचा खून केल्याची खळबळजनक घटना वरोरा शहरातील गांधी चौकात घडली.
तालुक्यातील पाहुणा गावातील 21 वर्षीय निलेश ढोक व 26 वर्षीय सुखराम अलाम हे दोघेही दुपारी वरोरा शहरात आले होते.
दोन्ही मित्र गावात अवैध दारूचा व्यवसाय करीत होते, निलेश चे काही पैसे सुखराम जवळ असल्याने त्याने पैश्याची मागणी केली मात्र सायंकाळी 5 ते 5.30 च्या सुमारास निलेश व सुखराम चे गांधी चौकात भांडण झाले, सदर वाद हा मारहाणीत बदलला व काही वेळात निलेशने स्वताजवळील चाकूने सुखराम वर हल्ला केला.
निलेशने सुखराम च्या गळ्यावर चाकूने जोरदार वार केला या हल्ल्यात सुखराम चा मृत्यू झाला.
मृतक सुखराम हा दारूच्या नशेत असल्याने निलेशचा चाकूचा प्रहार तो रोखू शकला नाही.
वरोरा पोलिसांनी आरोपी निलेश ढोक ला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
