बल्लारपूर - डुक्कर चोरी केल्याच्या वादातून बल्लारपूर शहरात 2 सख्ख्या भावंडांनी मिळून एकाची हत्या केली.
आज सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना आंबेडकर वॉर्ड परिसरातील रेल्वे लाईन जवळ घडली.
मृतकाच नाव 35 वर्षीय राकेश दर्शन बहुरीया आहे तो आंबेडकर वार्डात राहत होता.
आरोपी राजकुमार राजू बहुरीया हा सुद्धा आंबेडकर वार्डात राहत होता, news34 आरोपी व मृतक यांचा डुक्कर विकण्याचा धंदा असल्याने नेहमी दोघांचे भांडण व्हायचे, दोन दिवसांपूर्वी मृतक व आरोपीमध्ये चांगलाच वाद झाला होता. (News34)
आज सायंकाळी मृतक राकेश हा आपले दुचाकी वाहन क्रमांक एमएच 34 बीक्यू 1785 ने जात होता, त्यावेळी आरोपी राजकुमार ने राकेशच्या गळ्यावर news34 धारदार शस्त्राने वार केला.
अचानक झालेल्या हल्ल्यात राकेश हा गाडीवरून खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपीने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये आत्म समर्पन केलं, घटनेतील दुसरा आरोपी फरार असून बल्लारपूर पोलीस आरोपीचा शोध घेत तपास करीत आहे.
सदर घटनेनंतर रेल्वे लाईन परिसरात तणावाचे वातावरण आहे.
