ताजी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोरोनाच्या परिस्थितीत आता फरक दिसत आहे परंतु म्हणावे तितके आकडे खाली आले नाहीत. रुग्णसंख्या कमी होत चालली असली तरी गेल्या वेळच्या सर्वोच्च संख्येच्या जवळ आपण आता आलो आहोत. राज्यात कडक लॉकडाउन नाही मात्र निर्बंध 15 जून पर्यंत कायम ठेवावे लागणार.
दुसर्या लाटेतला विषाणू झपाट्यानं पसरतोय. त्यामुळे कडक लॉकडाऊन नाही परंतु निर्बंध कायम राहणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
