घुग्घुस - नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या बैरामबाबा नगर,स्नेहनगर,साईनगर, अमराई वॉर्ड अशा अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई आहे. वेकोलीच्या कोळसा ब्लास्टिंगमुळे पाणी खोल जात असल्याची चर्चा आहे. उन्हाळा असल्यामुळे नागरिकांचा पाण्याचा वापर जास्त होतो नळ 45 मिनिट सोडत असल्याने आणि नागरीक नळाला टिल्लू पंप लावून पाणी घेण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे काही नागरिकांना पाणी मिळत नाही यामुळे नागरिक त्रस्त आहे.नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी घुग्घुस नगरपरिषदेचे प्रशासक निलेश गौड यांच्याकडे केल्यामुळे त्यांनी टिल्लू पंप धारकावर कारवाई करण्याचे आदेश नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिले त्यामुळे वॉर्ड क्रमांक 1ते 6 येथे पाणीपुरवठा विभागाच्या पथकाद्वारे नळाला टिल्लू लावणाऱ्या पंप धारकांवर धाडी टाकून एकूण 80 पंप जप्त करण्यात आले.यामुळे नळाच्या पाण्यात वाढ होऊन नागरिकांना पाणी मिळणे सुरु झाले आहे.ही कारवाई नगरपरिषदचे पाणीपुरवठा अधिकारी अमर लाड यांच्या नेतृत्वात हरी जोगी,सचिन चिकणकर,अशोक रसाळ,बंडू आसपवार,अनुराधा, लक्षमी येरावार तसेच त्यांची टीम यांनी केली तसेच ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले यामुळे टिल्लू पंप धारकारचे धाबे दणाणले.
