चंद्रपूर - शहरातील इंदिरा नगर प्रभागात अवैध दारूविक्री मुळे त्रस्त नागरिकांनी दारू विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा नेला.
नगरसेवक अमजद अली यांच्या नेतृत्वात महिलांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले.
मागील अनेक वर्षांपासून इंदिरानगर परिसरात अवैध दारूविक्री सुरू आहे नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली की त्यांच्यावर नाममात्र कारवाई होते.
यासाठी इंदिरानगर परिसरातील महिलांनी घराबाहेर निघून अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी केली आहे.
यावर रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी माहिती दिली की त्या अवैध दारू विक्रेत्यांवर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहे, जर त्यांनी पुन्हा अवैध दारू विकायला सुरुवात केली तर नागरिकांनी माझ्याकडे येऊन तक्रार करावी.
आम्ही अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करू असा इशारा पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी दिला आहे.
