सावली : पोलीस ठाण्यात अवैध मोहफुल दारू विक्री प्रकरणातील आरोपीने स्वच्छतागृहात हारपिक सदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असुन ह्या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.
सावली येथे दिनांक 22 मे 2021 रोजी पोलिसांनी गस्तीदरम्यान किसान नगर भागात धाड घालुन अवैध मोहफुल दारूविक्री करणार्यांना अटक करण्याच्या कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला व अटकेसाठी गेलेल्या वाहनावर दगड फेक केली. त्यानंतर पळून गेलेले आरोपी ने काल रात्रौ च्या दरम्यान परिवार सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र पहाटेच्या सुमारास ह्यातील आकाश नामक आरोपीने स्वच्छता गृहात हारपिक सदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी त्याला तात्काळ सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यानंतर चंद्रपूर येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.सद्या आरोपीची प्रकृती ही धोक्याबाहेर असल्याचे कळते. सदर आरोपीवर अजूनही अटकेची कारवाई होणे बाकी होते मात्र पोलीस मारहाण करतील या धास्तीने आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार शिरसाट करीत आहे.
विशेष म्हणजे आरोपींच्या या कृत्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, कारवाई टाळण्यासाठी जर असे प्रकार आरोपी करीत राहणार तर पोलीस कारवाई करणार तरी कसे?
