नागभीड - क्षुल्लक वादातून एका महिलेला 6 ते 7 जणांनी मिळून अमानुषपणे मारहाण करण्यात आली, सध्या ती महिला मृत्यूशी झुंज देत आहे.
21 मे ला 36 वर्षीय रुकय्या अल्ताफ शेख रा. शिवनगर नागभीड ही महिला सकाळी आपल्या घरासमोर बसली असतांना शेजारी राहणारे मंगेश येरने व त्यांच्या बायकोने रुकय्या ला अश्लील शब्दात शिवीगाळ करीत मारहाण केली.
घडलेल्या प्रकाराची तक्रार रुकय्या यांनी नागभीड पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी रुकय्या ला उपचारासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविले, सायंकाळी रुकय्या घरी आली त्यावेळी आरोपी मंगेश येरने, त्याचा साळा आई, बायको निलेश येरने व त्याच्या बायकोने रुकय्या च्या घरी जबरदस्तीने प्रवेश केला.
हातात सब्बल व टिकास घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
घरातील टीव्ही, आलमारी व इतर वस्तूंची येरने व त्यांच्या नातेवाईकानीं तोडफोड केली.
यासोबत रुकय्या च्या डोक्यावर सबलीने प्रहार केला, रुकय्या च्या जबडा व डोक्यावर मंगेश येरने यांनी जोरदार प्रहार केला या प्रहारात रुकय्या जागीच बेशुद्ध पडली, त्यानंतर आरोपींनी रुकय्या च्या पतीला सुद्धा मारहाण केली.
विशेष म्हणजे हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी रुकय्या ने पोलिसांना कॉल केला मात्र पोलीस काही आले नाही.
रुकय्या ची परिस्थिती चिंताजनक असल्याने तिला सावंगी मेघे, वर्धा येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नागभीड पोलिसांनी आरोपींवर 452, 326, 427 व 34 अंतर्गत गुन्हे दाखल केले असून सर्व आरोपी जामिनावर बाहेर आले.
महिला सुरक्षेच्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या पोलीस प्रशासनाने वेळीच घटनास्थळी दाखल झाले असते तर रुकय्या आज अश्या परिस्थितीत नसती.
