दुर्गापूर : दुर्गापूर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या वरवट येथे अवैध रित्या मोहा दारू काढत असल्याची गुप्त माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच वरवट येथील शेतशिवारात मोहा दारू भट्टीवर धाड टाकूण १ लाख ८५ हजार रू.चा मुद्देमाल दि.२२ मे ला जप्त करण्यात आला असून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
मोहा दारू भट्टीवरून मोहा दारू ५० लिटर, कि.२५ हजार, मोहा सडवा ८०० लिटर कि.१ लाख ६० हजार अशी एकूण १ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून रितेश निमगडे (३३) ,पाहिजे रायपुरे हे दोघेही रा.वरवट या दोन आरोपींवर २१ कलम ६५ (फ) (ई) म.दा.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई दुर्गापूर पोलिस स्टेशनचे पीएसआय किशोर सहारे, पो.ह.मंजूळकर, योगेश यांनी केली आहे.
