ब्रम्हपुरी):-- भुज परिसरात वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असतांना एका अनाेळखी इसमाचे प्रेत आढळले.
भुज जंगल परिसरात कक्ष क्र. २०३ परिसरात वनरक्षक दुधे हे गस्त घालत असतांना त्यांना एक अनाेळखी इसम मृत पावलेल्या अवस्थेत दिसुन आला.सदर इसमाचे वय अंदाजे ७० वर्ष असुन पुर्णत: सदर इसमाचे प्रेत जिर्ण अवस्थेत हाेते.सदर माहिती मेंडकी पाेलिस स्टेशनला कळताचं सदर इसमाच्या प्रेताचा पंचनामा करून कलम १७४ जाफाै अन्वये पाे.स्टे.मर्ग क्र. ४३/२०२१ दाखल करण्यात आला.सदर इसमाची ओळख पटली असुन ताे वेडसर व पागलपणामध्ये भुज जंगल परिसरात पायवाटेने फिरत असतांना झाडाखाली झाेपला असावा व तिथेच त्याचा मृत्यु झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत असुन पुढील तपास मेंडकी पाेलीस स्टेशनचे खुशाल उराडे,पवन डाखरे,सुरपाम आदी करत आहेत.सदर अनाेळखी इसमाबाबत अधिक माहिती असल्यास पाेलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे कळविण्याचे आवाहन मेंडकी पाेलीस करीत आहेत.
