घुग्गुस - वर्ष 2017 ते 2020 या कालावधीत घुग्गुस पोलिसांनी केलेल्या एकूण 388 कारवाईत जप्त करण्यात आलेली 3 कोटींची अवैध दारू आज न्यायालयाचे आदेशाने नष्ट करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा दारुबंदीनंतर अवैध दारूचा जणू महापूर जिल्ह्यात आला होता, त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त कारवाईचा ताण वाढला मात्र परिस्थिती बघता पोलिसांनी आपले कर्तव्य बजावीत कारवाई करणे सुरू केले.
3 वर्षात घुग्गुस पोलिसांनी जप्त केलेल्या अवैध दारू आज न्यायालयाच्या आदेशाने शेणगाव येथील गुप्ता कोल वॉशरीच्या मागील भागात या अवैध दारूवर पोलिसांनी रोलर चालवून नष्ट केली.
या वर्षीच्या कारवाईत अवैध दारू संदर्भात न्यायालयाचा आदेश प्रस्तावित असून आदेश मिळाल्यावर ती दारू सुद्धा नष्ट करण्यात येणार अशी माहिती घुग्गुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे, उत्पादन शुल्क विभागाचे मारोती पाटील, उमाकांत गौरकर, महेश कुंभारे, गजानन झाडे, सचिन बोरकर, विनोद लोखंडे, रामदास आडे, मनोहर धारणे, जगदीश कापटे, रविकांत नीमगडे, नागो दहेगावकर आदींची उपस्थिती होती.
