घुग्गुस - मुंगोली जवळील उड्डाणपुलावर मोठे खड्डे झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
7 मे ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास सप्रा ट्रान्सपोर्ट कम्पणीच्या 18 चाकी वाहन उड्डाणपुलाच्या खाली कोसळले.
18 चाकी वाहन क्रमांक एमएच 34 एव्ही 1244 सकाळी पैनगंगा, मुंगोली वरून कोळसा लोडिंग करून घुग्गुस कोल सायडिंग कडे येत होता मात्र ज्यावेळी हे वाहन उड्डाणपुलावर आले नेमकं त्याचवेळी वाहनातील स्टेरिंग रॉड तुटल्याने 18 चाकी ट्रक पुलाखाली कोसळला.
या घटनेत वाहनचालक गडचांदूर निवासी 41 वर्षीय सुनील सातरे हे किरकोळ जखमी झाले.
सदर पुलावर मोठे खड्डे निर्माण झाले आहे त्यामुळे या पुलावर नेहमी अपघाताच्या घटना होत असतात, याबाबत नागरिकांनी वेकोली प्रशासनाला सूचना सुद्धा केल्या मात्र वेकोली प्रशासनाने नेहमी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.
