राजुरा - वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकाऱ्याच्या दप्तर दिरंगाई आणि अपमानास्पद वागणुकीने त्रस्त होऊन सास्ती येथील आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय युवतीने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली होती.
आशाचे वडील व तिच्या आजोबांच्या नावाने असलेली शेती वेकोलीमधे संपादित करण्यात आली आहे. या प्रकरणी महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकारी याने दिनांक २२ मार्च २०२१ ला आपल्या कार्यालयात बोलावून आशा सह तिच्या परिवारातील आई, वडील, मोठे वडील, काका यांना पाचारण केले. यावेळी तिचे वडील व आजोबा यांनी संमतीपत्राद्वारे आपल्या मुलीला नौकरी देण्याचे करारनामा दिला होता. परंतु या नियोजन अधिकाऱ्याने आशा ला तिच्या संपूर्ण परिवारा समोर अपमानित करत अपशब्द वापरले असे तिच्या वडिलांसह कुटुंबातील नातेवाहिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर तिने घरी येऊन विष प्राशन केले. परंतु आशा ने वीष प्राशन केले याबाबत घरच्याना काहीही माहिती नव्हते. दुसऱ्या दिवशी अचाणकपणे आशा ची प्रकुती खराब झाल्याने त्यांनी सास्ती येथील खाजगी रूग्णालयात औषधोपचार केले. आणखी प्रक्रुती बिघडत गेल्याने दिनांक २७ मार्च ला चंद्रपुर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे ३१ मार्च ला चंद्रपुर जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचारांसाठी आणले असता सकाळी दहा वाजता च्या दरम्यान आशा ची प्राणज्योत मालवली होती. मृतकाच्या नातेवाइकांनी आपले मुळगाव साखरी येथे आशावर अंत्यसंस्कार केले. 3 एप्रिलला सायंकाळी राजुरा पोलीस ठाण्यात वेकोली अधिकारी पूलय्या वर आशाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असता पोलिसांनी वेकोली अधिकाऱ्यांवर आशा ला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले यासाठी कलम 306 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी.दरेकर करीत आहे.
