चंद्रपूर - जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या बदलीचे आदेश 23 एप्रिलला जारी करण्यात आले असून त्यांच्या जागी गोंदिया जिल्ह्यात कार्यरत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वर्ष 2019 ला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून गोंदिया जिल्ह्यात कार्यरत अतुल कुलकर्णी यांनी कायदा व सुव्यवस्था चांगल्या रीतीने राबवली असून तसेच कार्य चंद्रपूर जिल्ह्यात करण्याचा त्यांचा मानस आहे.
चंद्रपुर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी आपल्या शांत व संयमी स्वभावाची चंद्रपुरात चांगलीच भुरळ पाडली असून त्यांचे कार्य चंद्रपूरकरांच्या मनात नेहमीच राहणार.