चंद्रपूर - दिनांक 21.4.2021 रोजी चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील केलझर उपक्षेत्रातील दाबगाव जवळील शेता मधील पाण्याने भरलेल्या विहरीमध्ये अंदाजे सहा सात महिन्यांचा वाघाचा नर बछडा(छावां) पडल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली त्या माहिती आधारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी सहा जलद बचाव पथक (RRT)ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, हे सुध्दा घटना स्थळावर पोहचून पाहणी केली.वरीष्ठ वन अधिकारी व डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी(वन्यजीव) TATR, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अजय मराठे ,जलद बचाव गठ, tatr ,यांनी Catch pole च्या सहायाने वाघिणीचे पिल्लू सुखरूप विहिरी बाहेर काढून पिंजऱ्यात टाकले,डॉ. Podchlwar हे उपस्थित होते. सदर वाघिणीच्या पिल्लास पुढील उपचार करिता TTC chandrapur येथे नेण्यात आले.