चंद्रपूर - कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला, या काळात सुद्धा अवैध धंदे मात्र बंद झाले नाही.
अवैध दारू असो की सुगंधित तंबाखू आजही हे सर्रासपणे सुरू आहे.
नैसर्गिक आपत्ती ने अनेकांना बेरोजगार केले व यामधून काही गुन्हेगारी प्रवृत्ती च्या अधीन झाले आहे.
25 एप्रिल च्या रात्री पडोली येथील MSW कॉलेज, कंडा नगर परिसरात राहणारे नुसरत फरीद शेख हे कामानिमित्त कुटुंबियांसोबत अहेरी ला गेले होते, 26 एप्रिलला जेव्हा शेख कुटुंब घरी आले तर त्यांच्या घरातील साहित्य अस्तव्यस्त अवस्थेत होते.
घरातील आलमारी बघितली असता त्यामधील 10 हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण 30 हजारांचा ऐवज चोरीला गेला.
शेख कुटुंबीयांनी याबाबत पडोली पोलीस स्टेशन गाठत चोरीची तक्रार दाखल केली.
घटनेचा तपास पडोली पोलीस करीत आहे.