चंद्रपूर:- शुभारंभ प्रसंगी बोलतांना देशात वाढत चाललेले कोरोनाचे रूग्ण तथा अशा संकट काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तसेच तज्ञ मंडळींनी मास्कचा वापर अनिवार्य समजुन मास्कचा वापर करा असे वारंवार विनंती करित आहेत. शुभारंभ प्रसंगी पूर्व केंद्रीय गुह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, स्वतः सुरक्षित राहुन कुटूंब व समाजाला सुरक्षित करावे अशी विनंती करून गुढीपाडव्याच्या शुभदिनी मास्क वाटपचे शुभारंभ केले.
प्रधानमंत्र्यांनी 24 मार्च 2020 चे लाॅकडाऊनचे आवाहन आम्ही विसरलो नाही परिणाम 135 कोटी जनसंख्येच्या देशात संक्रमितांच्या रिकव्हरी दराचे प्रमाण जगात सर्वात जास्त व मृत्युदर सर्वात कमी होता. जनतेनी प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला व जनप्रतिनीधी, आरोग्य क्षेत्रातील अधीकारी, कर्मचारी व प्रशासनातील अन्य विभागातील लोकांनी प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
आज पुन्हा कोरोनाचे संकट उभे झाले आहे याहीवेळेस जनतेनी सर्व सुचनांचे पालन करतांना ज्यात 45 वर्षा वरील नागरीकांना मिळणारे व्हॅक्स्ीन काही क्षेत्रात विद्याथ्र्यांना, काही कर्मचारी वर्गाला व्हॅक्सीन दिले जात असल्याने फार मोठा दिलासा देशात मा. प्रधानमंत्री नरेंद्र मादीजींच्या सरकारने दिलेला असला तरी मास्क चा वापर आपण बंद करू शकत नाही, सतत मास्क लावून व्यवहार करावा याची जाणीव ठेवून गुढीपाडव्याच्या शुभदिनी भाजपा कार्यालयातून मास्कचे वाटप करण्यात येत आहे. काही प्रमाणात याच्यातुन जनजागृती नक्कीच होईल अल्प लोकांना लाभ होईल परंतू सामाजिक संस्था, नागरीकांनी व कार्यकर्त्यांनी ‘‘माझा मास्क, माझे व्हॅक्सीन’’ अभियानात सामिल होवून अभियान जनताभिमुख होईल, समाज सुरक्षित होईल याकरीता पुढाकार घ्यावा अशी विनंती पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.
हे अभियान चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येईल. चांगल्या संख्येने लोकांनी मास्क वाटपाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला सोबत कार्यक्रमात हळदीयुक्त दुधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात मोजक्या पदाधिकाÚयांना बोलावून कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात विजय राऊत, खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, मोहन चौधरी, राजु येले, विकास खटी, पुनम तिवारी, नकुल आचार्य, कार्तीक मुसळे, चंद्रप्रकाश गौरकार आदींसह अन्य भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.