चंद्रपूर : सौम्य लक्षण असलेल्या कोरोना रुग्णांकरिता गृह विलगीकरण सर्वोत्तम पर्याय आहे. गृह विलगीकरण करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून नवीन रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. गृह विलगीकरणातील या रुग्णांना मोफत सेवा देऊ इच्छिणाऱ्या सेवाभावी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाच्या कंट्रोल रूमला आपली माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
तरी इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली नोंदणी करण्यासाठी कंट्रोल रूमला 07172-274173 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या समाजसेवी कार्याला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला असून त्यांच्या कार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेत रुग्णांना मोफत सेवा देऊ इच्छिणाऱ्या डॉक्टरांनी प्रशासनाकडे नोंद करावी असे आवाहन केले आहे.
मात्र चंद्रपुरातील खाजगी डॉक्टर विलीगिकरणासाठी रुग्णांकडून अमाप पैसे उकळत असून त्यांच्यावर कारवाई करायला हवी जेणेकरून अश्या लुटारू प्रवृत्तीला काही प्रमाणात चाप लागला असता.
