चंद्रपूर - चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. या मोक्षधाम च्या मागे वापरलेल्या PPE किट्स लावरीस अवस्थेत फेकल्या गेल्या आहे.
काही PPE तर नदीत पडलेल्या आहे, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने अनेकांनी आपला जीव गमावला, मृत्यूचे चक्र हे सुरूच असून दररोज मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे.
शिव मोक्षधाम स्मशान भूमीत पालिकेद्वारे कंत्राटी पध्द्तीवर मृतदेह जाळण्यासाठी काहींची नेमणूक केली असून ते सर्व PPE किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत आहे, मात्र त्यांनी घातलेल्या PPE किटचे काय होते याबाबत पालिकेच्या स्वच्छता अधिक्षकांशी संपर्क साधला असता ते नेटवर्कच्या बाहेर होते.
नियमाने वापरलेल्या PPE किट्स जाळून नष्ट करायला हव्या मात्र त्या किटा मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीच्या मागे पडलेल्या आहे.
यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला असून चंद्रपूर मनपाने याकडे जातीने लक्ष द्यायला हवे.
अन्यथा कोरोनाचा उद्रेक हा कायम राहील.