चंद्रपूर - जनतेच्या जीवनात प्रकाशाचे किरण पोहोचविनाचे व्रत अंगीकारून कर्तव्य पार पडताना करोना ची लागण महावितरण चंद्रपूर परिमंडळ, महानिर्मिती चंद्रपूर व महापारेषण चंद्रपूर व मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना होत आहे. आतापर्यंत महानिर्मिती, महावितरण चंद्रपूर परिमंडळ मधील 8 व महानिर्मिती चंद्रपूर कार्यक्षेत्रात 11 कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन *महानिर्मिती, महापारेषण व महावितरण चंद्रपूर परिमंडळ* यांच्या संयुक्त विद्यमाने या तीनही कंपनीत चंद्रपूर येथे कार्यरत कर्मचारी कोविड 19 बाधित झाल्यास, त्यांना विलगीकरणात राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापारेषणचे ऊर्जानगर येथील अति उच्च दाब वितरण केंद्र म्हणजे एच.व्ही.डी.सी.अतिथीगृह येथे विलगीकरण केंद्र दिनांक 1में 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. यासंदर्भात महावितरण चंद्रपूर परिमंडळा चे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे, महानिर्मितीचे चंद्रपूर महा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता श्री. पंकज सपाटे व महापारेषण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.महेंद्र वाळके यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सदर विलगीकरण कक्षात कोविड 19 ने बाधित रुग्ण कर्मचाऱ्यांसाठी जेवण, पल्स ऑक्सिमीटर, थेर्मोमीटर आदी मूलभूत सुविधा उपलबध्द करुन देण्यात आल्या आहेत.
महावितरण चंद्रपूर मध्ये सध्या 218 करोना बाधित कर्मचारी असून 8 कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे. 76 कर्मचारी दुरुस्त झाले आहेत. तर महानिर्मिती चंद्रपूर कार्यक्षेत्रामध्ये सध्या 56 कर्मचारी करोना बाधित आहेत व 11कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे.145 कर्मचारी दुरुस्त पण झाले आहेत. तसेच महापारेषण चंद्रपूर कार्यक्षेत्रामध्ये 15 कर्मचारी बाधित असून 12 दुरुस्त झाले आहेत.
कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.