ताजी बातमी - टीव्ही टुडे नेटवर्क व आजतक न्यूज चॅनेल चे अँकर पत्रकार रोहित सरदाना यांचं कोविड मुळे मृत्यू झाला.
Aaj tak या देशातील अग्रेसर वृत्तवाहिनीत मागील अनेक वर्षांपासून ते पत्रकार व अँकर म्हणून कार्यरत होते, ते दंगल या कार्यक्रमाचे प्रमुख होते.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती, उपचारादरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आला त्यामध्ये त्यांचं निधन झालं.
त्यांच्या मृत्यूने देशातील पत्रकारांमध्ये हळहळ निर्माण झाली आहे, अनेक जेष्ठ पत्रकारांनी रोहित सरदाना यांच्या दुःखद निधनावर शोक संवेदना व्यक्त केली आहे.