चिमूर - चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते सध्या गृह विलीगिकरणात आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आमदार भांगडीया यांनी संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला असून सर्वांनी सुरक्षित रहावे अशी विनंती केली आहे.
आमदार भांगडीया यांनी कोरोना काळात सुद्धा नागरिकांच्या मदतीला वेळोवेळी हजर रहायचे, मात्र आज त्यांना कोरोनाने वेढलेले असल्याने ते काही दिवस गृह विलीगिकरणात राहणार असून कोरोनाला हरवून ते पुन्हा जनसेवेत दाखल होणार आहे.
