कोरपना - तालुक्यातील मौजा माथा गावामधे कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशन्ट संख्या वाढीवर असुन ७ दिवसामधे ताप (उष्णघात ) आणि कोरोनाने ५ पेशन्ट दगावले असून होम कॉरंटाईन पेशन्ट आणी त्याच्या घरचे व्यक्ती खुलेआम गावामधे फिरत असताना गावातील संरपच पोलीस पाटील नजर अंदाज करीत आहे .कोविड आजारावर नियत्रंण ठेवण्याकरीता समितीची निवड करन्यात आली असुन . त्याच समितीमधिल सदस्यांच्या घरचे पेशन्ट पॉझिटिव्ह असताना विनाकारण गावामधे फिरत आहे . माथा गावाला उपकेन्द्र असून सुद्धा येवढया मोठया संख्येने रुग्ण सापडत असून अर्धे गाव आजारी पडले आहे प्रत्येक घरी तीन ते चार व्यक्ती आजारी असून गावात पॉझिटिव्ह संख्या वाढीवर आहे विलगिकरन कक्षाची आवश्यकता आहे परंतु प्रशासना तर्फे कोणतीही खबरदारी घेतली जात नाही आहे. असेच जर चालत राहीले तर मरणाऱ्यांची संख्याही वाढतच राहील . गावातील नागरिक तापाच्या आजाराने ४०ते ५० टक्के परेशान आहे . चेकअप करायला गेले तर पॉझिटीव्ह निघले तर पैशाअभावी जाऊ शकत नाही खेडेगाव असल्याने शेतकरी आणि मजुरांची संख्या जास्त आहे मागील वर्षीच्या लॉक डाऊन मुळे आणि शेतकऱ्याची बोंड अळीमुळे आणि शेतमजुराची काम नसल्यामुळे आर्थीक परिस्थिती खराब आहे पैसे मिळाले तर बेड मिळत नाही बेड मिळाला आणि पेशन्ट उपचार करीत असताना दगावला तर प्रेत देत नाही . अश्या दहशतीमधे सध्यासिती माथा वासिय जनता जगत आहे.तर दुसरीकडे राजुरा तालुक्यातील देवाडा येथे तसेच देवाडा बोहतील गावा मध्ये सुद्धा वायहरल इन्फेक्शन वाढले आहे ही बिकट परिस्थितीथी असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून इथेही अर्धे गाव आजारी आहे या दोन्ही गावात व्हायरल इन्फेक्शन वाढले असून गावात फोगिंग करणे गरजेचे झाले आहे शासन व प्रशाशनाने आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी - अब्दुल जमीर अब्दुल हमीद प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल गोंडवाना गणतंत्र पार्टी केली आहे.