राजुरा:---चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात कोळसा खाण परिसरात आज सकाळी मोठा अपघात घडला.
राजुरा तालुक्यातील गोवारी कोळसा खाणं परिसरात सकाळी हजेरी कार्यालयात घुसला अनियंत्रित अजस्त्र डंपर शिरला.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात कोळसा खाण परिसरात मोठा अपघात झाला आहे. गोवरी खाण क्षेत्रात हजेरी कार्यालयात अनियंत्रित अजस्त्र डंपर घुसला. या कार्यालयात कामगार आणि अधिकारी विविध कामासाठी एकत्र आले होते. ही इमारत कच्ची आणि लोखंडी रॉडचा वापर करून तयार केली होती. प्राथमिक माहितीनुसार 2 अधिकारी 2 कामगार या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. जखमींमध्ये प्रभाकर चन्ने, जे. पी. महतो, हे कामगार तर कौशलेंद्र प्रसाद, मनीष साखरे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सध्या डंपर घटनास्थळावरून हटविण्यासाठी कारवाई सुरू झाली आहे. या अपघाताचा वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड व्यवस्थापनाच्या वतीने प्राथमिक तपास सुरू करण्यात आलाय.