चिमूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना काही काळ बर्ड फ्लू ने उन्माद माजविला होता, मात्र आता चिमूर -जांभूळघाट मार्गावर शेकडोच्या संख्येत बायलर कोंबड्या मृतावस्थेत आढळल्याने पुन्हा बर्ड फ्लूची खळबळ माजली आहे.
त्या कोंबड्या कश्याने मृत पावल्या? कुणी फेकल्या? असा प्रश्न उपस्थित झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
