चंद्रपूर :--चंद्रपूर शहरातील शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर बाधीत वृद्धाची प्रचंड परवड बघायला मिळाली आहे. सकाळपासून मूल मार्गावरील वन अकादमी परिसरात एका झाडाखाली तळमळत असलेल्या वृद्धाचा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय. या वृद्धाचा swab नमुना बाधीत असल्याचा अहवाल आल्यावर कुटुंबीयांनी घरून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बेड नसल्याने वन अकादमी परिसरात आणले मात्र त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला गेलाय. हा रुग्ण बेवारस असल्यासारखा एका पदपथावर उपचाराविना तळमळत आहे. बाधिताला तातडीने बेड आणि ऑक्सिजनची गरज आहे. नातेवाईकांनी वारंवार प्रयत्न करूनही प्रशासनाचा असंवेदनशीलपणा कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज 937 विक्रमी रुग्णसंख्या नोंदली गेली आहे तर 11 मृत्यू झालेत. कोरोना हाहाकाराने प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.