सिंदेवाही-तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रात सकाळी वनमजुर मोहफुल गोळा करण्यासाठी गेला होता.मोहफुल गोळा करतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने पाठीमागून हल्ला करून वनमजुराला जागीच ठार केले. सिरकाडा,शिवणी,वासेरा,मोहाळी, कुकडहेटी या गावातील नागरिक हे जंगल परिसरातील काही घटकांवर अवलंबून आपले उदरनिर्वाह करतात. जसे बांबूच्या टोपल्या, चटई, ताटवे हा प्रकारची साहित्य बनवण्यासाठी जंगलातुन बांबू आणायला जाणे त्यांना अनिवार्य, व अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जंगलातील मोहफूल हे घरातील प्राण्यांसाठी व स्वतःला भाकरी बनवून खण्याकरिता ते गोळा करतात. मात्र जंगलात व गावशेजारी सुद्धा वाघाची दहशत असल्याने वाघाच्या हल्ल्यात वनमजुर ठार झाल्याच्या घटना या काही महिन्याचा कालावधी लोटल्यावर घडतच असतात.अशीच घटना दिनांक ०३-०४-२०२१ ला सकाळी ८:०० वाजता सिरकाडा लगत असलेल्या वनपरिक्षेत्रात घडली.सिरकाडा येथील वनमजुर श्रीधर राघोजी आत्राम वय ४० वर्षे हा व्यक्ती पोटाची खडगी भरण्यासाठी जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी गेला असतांना त्यांच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. त्यामुळे अश्या घटना वारंवार घडू नये या साठी काही उपाययोजना करण्यात यावे.
कुठलाही रोजगाराच साधन उपलब्ध नसल्याने पोटाच्या कळा मिटवण्यासाठी त्यांना जंगलात जाणे हे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. शेवटी पोटा पाण्याचा तथा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.
म्हणून सरकारने या क्षेत्राची दखल घेऊन त्वरित उपाययोजना राबवून रोजगार निर्मिती करण्यात यावी.
