चंद्रपूर - महाराष्ट्र महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या ताई सवालाखे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा चित्रा डांगे, आणि शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुनीता अग्रवाल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मास्क वाटप करण्यात आले, या वेळी इंदिरा गांधी पुतळ्या जवळ त्याच प्रमाणे एस.टी. वर्क शॉप जवळ वाहतूक पोलीस, भाजी विक्रेते, इतर छोटे दुकानदार यांना N95 मास्क वाटप करण्यात आले त्याच बरोबर तो मास्क वापरणे कसे आवश्यक आहे, आणि कोरोना लस घेणे गरजेचे आहे या संबंधी प्रबोधन करण्यात आले. या वेळी सुनंदा धोबे, शीतल काटकर, एकता गुरले, सुनीता धोटे, नेत्रा इंगुलवार, प्रिया चंदेल, मुन्नी मुमताज शेख, मुमताज शकील, माजी नगरसेविका उषा धांडे आणि इतर महिला काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
