जिवती - जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पालडोह ही 365 दिवस सुरू राहणारी शाळा गुडफ्रायडे 2 एप्रिल 2021 ला सुरू होती.त्या शाळेत 190 पैकी 185 185 विध्यार्थी उपस्थित होते.
चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चकनिंबाळा येथील सरपंच,ग्रामसेवक,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,शिक्षक वृंद यांनी गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर यांच्या उपस्थितित सुट्टीच्या दिवशी पालडोह येथिल शाळेत शैक्षणिक अभ्यास दौरा आयोजित केला.
2 एप्रिल 2021 ला गुड फ्रायडे या दिवशी सर्वत्र शाळेला सुट्टी असतांना जिवती तालुक्यातील पालडोह ही 365 दिवस उघडी असणारी शाळा, नियमितपणे सुरू असलेली दिसली.
सुट्टीच्या दिवशी पालडोहची शाळा कशी चालते हे बघण्यासाठी चकनिंबाळा शाळेतील शिक्षकांनी मुद्दामच या दिवशी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले. गटशिक्षणाधिकारी यांनीही सहभाग दर्शविला. या शाळेत सकाळी 10 : 00 वाजता भेट दिली असता सकाळची शाळा सुरू होती. विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांच्या उपस्थित केले. या शाळेत विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवीत असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास भरपूर झालेला आहे. सदर दौऱ्यात सरपंच अनिता पिदूरकर, गटशिक्षणाधिकारी समाधान भासारकर,ग्रामसेवक विजय खोब्रागडे,शा. व्य. समिती अध्यक्ष गणपत पिदूरकर,उपाध्यक्षा सुरेखा गोचे,सदस्य प्रतिभा थेरे,सुवर्णा गौरकर,हरिदास वणशिंग,शुभांगी येरगुडे,रवींद्र मडावी,संजय काकडे,भावना गेडाम,मुख्याध्यापक विजय भोगेकर,आशा पिंपळकर,अरुण बावणे,सुरेखा वनकार,संतोष शुक्ला,आत्माराम शेंडे,निरक्षा उईके विशेष म्हणजे टेकामंडवा केंद्राचे केंद्र प्रमुख सुनील कोहपरे उपस्थित होते.
