चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून सुद्धा राजकारणी निव्वळ राजकारण करण्यात व्यस्त आहे, जनप्रतिनिधीनी रुग्णांना मदत करावी ही अपेक्षा असते मात्र जनप्रतिनिधी या परिस्थितीत सुद्धा एकमेकांचे पाय ओढताना दिसत आहे.
नुकतेच रविवारी आमदार जोरगेवार यांनी महिला रुग्णालयात भेट देत गरीब रुग्णांसाठी 10 व्हेंटिलेटर व 14 ऑक्सिजन युक्त बेड रविवारी सुरू होणार अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली होती.
मात्र ते बेड मनुष्यबळा अभावी सुरू झाले नाही, किमान 2 दिवसानंतर ते बेड सुरू होणार होते, मात्र वर्तमानपत्रात मनपा स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी यांनी आमदार जोरगेवार यांचेवर टीका करीत रुग्णांची फसवणूक आमदारांनी करायला पाहिजे नव्हती, आजच्या घडीला रुग्णांना बेड उपलब्ध होत नसून रुग्ण वणवण भटकत आहे, आमदार जोरगेवार यांनी बेड सुरू होणार अशी माहिती दिल्यावर रुग्णांचे नातेवाईक तर बेडसाठी संपर्क करणार मात्र ते बेड सुरू झाले नसून गरीब रुग्णांची थट्टा आमदारांनी केली.
यावर माजी नगरसेवक बलराम डोडानी यांनी स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी यांचा खरपूस समाचार घेतला.
मागच्या वर्षी आमदार जोरगेवार यांनी कोरोना काळात गरिबांच्या मदतीला धावून गेले, आजही ते नागरिकांच्या संपर्कात आहे, मात्र चंद्रपूर मनपाचे सत्ताधारी सदस्य या कोरोना काळात हातावर हात ठेवून नागरिकांच्या मृत्यूचे तांडव बघत आहे.
दुसरी लाट येणार हे ठाऊक असल्यावर ही मनपाने नियोजन केले नाही, आता मनपाच्या स्थाई समिती अध्यक्षपदी रवी आसवानी विराजमान झाले मात्र मनपाचे साधे कोविड सेंटर ते सुरू करू शकले नाही.
त्यातच राज्यातील पहिले आमदार म्हणून जोरगेवार यांनी पालिकेला 1 कोटींचा निधी कोविड सेंटर साठी दिला, स्वतः कृती शून्य काम करायचे आणि काम करणाऱ्या आमदारावर टीका करायची आणि तेही या कोरोना काळात.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर आमदार जोरगेवार वारंवार भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत, शहरात आरोग्य व्यवस्थेवर येत असलेला ताण आणि त्यावर उपाययोजना काय? यावर ते रोज कोविड सेंटर मधील बेड उपलब्धता, ऑक्सिजन बेड यावर लक्ष ठेवून आहे.
स्वतः कोरोनाकाळात चंद्रपूर मनपाचे पदाधिकारी शहरात फेरफटका मारत नसून, कोरोनाची काय गंभीर परिस्थिती आहे यावर मनपाचे लक्षच नाही, नेहमी निधी नाही म्हणून ओरड करणारी मनपा 18 कोटींच्या निविदा काढण्यात व्यस्त आहे.
सध्याच्या स्थिती मध्ये जनप्रतिनिधी व मनपाने एकत्र येत काम करून कोरोना बाधित रुग्णांना चांगला उपचार मिळावा यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, मात्र तसे काही न करता अचानकपणे स्थाई समिती अध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडलेल्या अध्यक्षांनी अशी टीका करणे म्हणजे स्वतःची निष्क्रियता लपविणे होय असा खरपूस समाचार माजी नगरसेवक बलराम डोडानी यांनी घेतला.